Something is happening that all right thinking individuals must resist....
The department of tribal development of the government of Maharashtra runs residential "ashram schools " for tribal children. Around 1.85 lakh children study in these schools.Children are provided all necessary things like uniforms , shoes, stationary, toiletories etc by the government. Upto 2016, these goods would be acquired by the school from contractors and supplied to children. The quality,as can be imagined, used to be abysmal. In 2017 , a decision was made to give money directly into the bank accounts of children so that they can purchase these things on their own. Bank accounts were opened in the name of children (jointly with their mothers fir the really young ones) and money transferred. The amount of this DBT ( direct bank transfer) is in the region of rs.135 crores. I was the director of the Mumbai School of Economics and Public Policy at that time. We were asked by the government to evaluate the way in which the children spent the money. We surveyed a little over 10000 children from 106 schools,all chosen by a proportional random sampling strategy..The survey was eye opening. More than 90 percent of the children preferred the new mode of delivery. They bought better quality stuff and yet saved some money. Some of the saved money was used for buying things for siblings, or buying more stationary than recommended, buying story books etc..I think it was a genuine ,long due reform.The only losers were the contractors and administrators who used to benefit from the contractors.
Come 2019, a new government and a new Minister. Secretaries change in rapid succession.. I hear that there is a demand to "reverse" the DBT scheme and go back to purchasing from contractors. A study group is appointed to "study" the scheme,but at least one member has already declared that the DBT scheme must go. If course our report says that 90 percent students want the scheme to continue. But they are only children. How can they know better than tribal politicians what is good for them ? There are established leaders among tribals who know better and who are convinced that the DBT scheme will destroy education. How can it destroy education, i argue. It is difficult to understand how letting children have better shoes and toothpaste is detrimental to their education.But it is not about children. It is about what those who claim the right to speak on behalf of the children. It is important for their politics that the scheme be shot down and contractors be brought in. After all, rs. 135 crores, no less,are involved. Cancellation of DBT has become a point of prestige for many . But they ought not to be allowed to succeed. Why should children be forced to wear poor quality shoes, use chalk powder disguised as tooth powder, bathe with cheap,harsh soaps, forced to use night dresses and pillows when they would rather have storybooks? I argue. I am told that I must be RSS to have prepared such a report. I am not RSS. In fact, if you ever said that within the hearing of anybody from the RSS, they might even file a defamation case against you for having insulted their organisation...sticking labels that we dont like onto inconvenient views helps to distract attention from inconvenient facts. My prediction is,facts aside, this Minister will want to wind the scheme up and go back to the contractors. All governments and bureaucrats have an immense interest in purchasing from contractors..contractors will be happy, minister will be happy, his babus will be happy. Only losers will be tribal children. They have no power . But we should not let this happen. At least I will dig in my heels as much as I can to resist this crooked scheme. If you agree,share this. Get your friends to share this. Publicize as much as possible and let public pressure build up.
Neeraj Hatekar
सर्व सुजाण व्यक्तींनी याला विरोध केलाच पाहिजे!
महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विकास विभाग आदिवासी मुलांसाठी निवासी आश्रमशाळा चालवतो. या शाळांमध्ये १ लाख ८५ हजार आदिवासी विद्यार्थी शिकतात. या विद्यार्थ्यांसाठी गणवेष, बूट, अभ्यासाचं साहित्य, साबण, तेल इ. वस्तू सरकारकडून पुरवल्या जातात. २०१६ पर्यंत या वस्तू कंत्राटदारांकडून शाळेला पुरवण्यात येत असत. वस्तूंचा दर्जा (अर्थातच) भयंकर असे. गरजेच्या वस्तू विद्यार्थ्यांनी स्वत:च विकत घ्याव्यात यासाठी २०१७ मध्ये त्यासाठीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेतली खाती विद्यार्थ्यांच्या नावाने उघडण्यात आली. ही रक्कम १३५ करोड इतकी होती.
मी मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचा संचालक असताना सरकारकडून, विद्यार्थी कशा प्रकारे खर्च करतात याचे परीक्षण करण्याची सूचना केली गेली. त्यानुसार आम्ही १०६ शाळांमधील सुमारे १०००० विद्यार्थ्यांच्या खर्चाचे सर्वेक्षण केले. ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी या पद्धतीला सकारात्मक प्रतिसाद देत होते. ते अधिक चांगल्या वस्तू खरेदी करुन काही प्रमाणात पैसे वाचतही होते. उरलेले पैसे भावंडांसाठी काही खरेदी करण्यासाठी, काही अधिक वस्तू खरेदी करण्यासाठी, गोष्टीची पुस्तकं खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ लागले. हा खरंच अत्यावश्यक बदल होता. यामधून केवळ कंत्राटदारांचं आणि त्यांच्याकडून फायदा उकळणा-या अधिकारी वर्गाचं नुकसान होत होतं.
२०१९ मध्ये सरकार आणि मंत्री बदलले. सचिवांची तातडीने बदली झाली. या योजनेमध्ये बदल करण्याची मागणी झाल्याचं कानावर आलं आहे. योजनेचा 'अभ्यास' करण्यासाठी अभ्यासमंडळाची नेमणूक झालेली आहेच मात्र एका सभासदाने ही योजना बंद झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. आमचा अहवाल असं सांगतो की ९०% विद्यार्थ्यांना ही योजना आवश्यक वाटते आहे. मात्र ती लहान मुलं आहेत. त्यांना आदिवासी विकास योजनेच्या मंत्र्यांपेक्षा अधिक समज कशी असेल? काही प्रस्थापित आदिवासी नेत्यांच्या मते डीबीटी (डायरेक्ट बँक ट्रान्स्फर) योजना शैक्षणिक नुकसान करेल. या योजनेमुळे नुकसान कसं काय होईल? अधिक चांगली टुथपेस्ट आणि बूट यामुळे शैक्षणिक नुकसान कसं काय होऊ शकेल?
यामध्ये त्या मुलांचा विचार केला जातच नाहीय. त्या मुलांच्या वतीने बोलणा-याचं हित साधण्याचा विचार मात्र त्यात नक्कीच आहे. त्यांच्या राजकारणासाठी ही योजना बंद पडण्याची गरज आहे. शेवटी यामध्ये १३५ कोटी रुपये गुंतलेले आहेत. हा मुद्दा अनेकांच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. मात्र ते यशस्वी होऊन चालणार नाही. त्या मुलांनी खराब बूट, टुथपावडर म्हणून खडूचा चुरा, खराब साबण, का वापरावेत? त्याऐवजी कमी किमतीत चांगल्या वस्तू खरेदी करुन ते गोष्टीची पुस्तकं विकत घेतील.
हा अहवाल तयार केल्यामुळे मी आरएसएसमधलाच असल्याचे आरोप केले गेले आहेत. जर आरएसएसला या गोष्टीची माहीती झाली तर ते अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मंत्र्याला ही योजना बंद पाडून पुन्हा कंत्राटंच चालू करायची आहेत असा माझा अंदाज आहे. सर्व नेते, अधिकारी यांना कंत्राटं चालू करण्यात अत्यंत रस असतो. कंत्राटदार, मंत्री, अधिकारीवर्ग, सगळेच खूष! होणारं नुकसान मात्र आदिवासी मुलांचं. हे थांबवण्याची गरज आहे. यामधली माहिती खणून काढण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर ही माहिती शेअर करा. आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला सांगा. जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचवून दबाव तयार करण्यासाठी मदत करा.