उसर MIDCतील शेतकरयांचा सातबारा कोरा
June 18, 2022 Metro Maharashtra  Network   
https://metromaharashtra.com/2022/06/18/usar-midc-farmers-satbara-korausar-midc-farmers-satbara-kora/

औद्योगिक भूखंड पुन्‍हा शेतीक्षेत्रात समाविष्‍ट
7/12 of farmers in Usar MIDC cleared
June 18, 2022 Metro Maharashtra News Network


Lands Reserved for Industrial has been returned to agriculture
अलिबाग – अलिबाग तालुक्यातील वावे, वळवली, आंदोशी, मल्याण, कुणे, उसर, खानाव परिसरातील शेतक-यांच्या सातबारा उता-यांवर ‘महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पासाठी राखीव’ अशा नोंदींचा उल्लेख असलेला शिक्का अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे 2010 मध्ये उठवण्यात आला होता. Farmer in Alibag taluka's Vave, Valavali, Andoshi, Malyan, Kune, Usar, Khanav areas farmers'  who had their 7/12 extracts stamped  'reserved for Maharashtra Government project'  in 2010 has been cleared mainly due to the efforts of former Alibag MLA Madhukar Thakur.
परंतु या गावातील सातबारावरील औदयोगिक क्षेत्रासाठी राखीव हा शिक्काही आता शासनाने 18 एप्रिल 2022 च्या अधिसूचनेनुसार उठविला असून बेलोशी ग्रामपंचायतीमार्फत बेलोशी येथे शेतकरयांना कोरया  सातबाराचे वाटप नुकतेच करण्‍यात आले. The marking   "reserved for the industrial area " on 7/12 extract in this village has now been lifted by the government vide notification dated 18th April, 2022 and and the cleared  7/12 extract  was recently distributed to the farmers in Beloshi through Beloshi Gram Panchayat.
 महाराष्‍ट्र  प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस Adv. प्रविण मधुकर ठाकूर व जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रविण ठाकूर यांनी वावे येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते अस्मिता पुराणीक, पुष्‍कर पुराणीक यांनी या प्रकरणात पाठपुरावा करून शेतक-यांच्या हितासाठी चांगले काम केले असल्याची माहिती दिली. Maharashtra Pradesh Congress Secretary Adv. Pravin Madhukar Thakur and District Congress Senior Vice President Rajendra Thakur were present on the occasion. Speaking on the occasion, Pravin Thakur said that Asmita Puranik, a journalist and social activist from Vave, and Pushkar Kar Puranik have done a good job for the benefit of the farmers by following up the case
अलिबागचे माजी आमदार स्‍व. मधुकर ठाकूर यांचे या प्रकरणातील योगदान लक्षात घेवून त्यांनी व बेलोशी ग्रामपंचायत यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून पप्पांच्या स्मृती जागृत करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. Former MLA of Alibag Recognizing Madhukar Thakur's contribution in this matter, he and Beloshi Gram Panchayat thanked him for attending the event and giving him the opportunity to awaken the memory of his father.

 बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील  300 हून अधिक शेतक-यांच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल बेलोशी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा भोपी व माजी पंचायत समिती सदस्य श्रीधर भोपी यांनी शासनाचे आभार मानले . स्‍व. मधुकर ठाकूर यांनी ते हयात असताना घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असल्याचे सांगितले.
. Beloshi Gram Panchayat Sarpanch Krishna Bhopi and former Panchayat Samiti member Shridhar Bhopi thanked the government for heeding the demands of more than 300 farmers in Beloshi Gram Panchayat. this was possible due to  Late Madhukar Thakur's  hard work while he was alive
  बेलाशी ग्रामपंचायतीतर्फे शेतक-यांना सातबारा वाटप करण्याच्या कार्यक्रमास अॅड. प्रफुल्ल उर्फ भोला पाटील, राकेश भोपी, भास्कर भोपी, श्रीकांत नाईक, विलास पाटील, गिरीष पाटील ,हरिचन्द्र गावंड, जनार्दन शेळके, जगदिश गायकर,नन्दकुमार काटले व ग्रामस्थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. At Belashi Gram Panchayat, Adv. Praful alias Bhola Patil, Rakesh Bhopi, Bhaskar Bhopi, Shrikant Naik, Vilas Patil, Girish Patil, Harichandra Gawand, Janardan Shelke, Jagdish Gaikar, Nandkumar Katle and villagers were present in large numbers.
जमीन प्रकल्पासाठी नको असतानाही सातबारावरील औदयागिक भूसंपादन क्षेत्र हा शिक्का कायम असल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व तत्कालीन उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांना मधुकर ठाकूर यांनी केलेल्या विनंतीमुळे महाराष्ट्र शासनाने वरील गावांच्या सात बारावर असलेला शिक्का उठविण्याची अधिसूचना २८ जुलै २०१० राजपत्रात प्रसिद्ध केली होती .
At the request of Madhukar Thakur to the then Chief Minister Ashok Chavan and the then Industry Minister Rajendra Darda, the Government of Maharashtra had published a notification in the Gazette on 28 July 2010 to remove the seal on Satbara of the above villages.


. उसर प्रकल्पाच्या दुस-या टप्प्यासाठी राखीव म्हणून वावे, वळवली, आंदोशी, मल्याण, कुणे, उसर, खानाव या गावांतील जमीन प्रकल्पासाठी घेण्यात आली होती. औदयागिक क्षेत्र या शिक्क्यामुळे शेतक-यांना आपल्या शेतामध्ये काहीही करता येत नव्हते. त्याचबरोबर आपल्या गरजेसाठी जमिनीवर कर्ज अथवा विक्री करता येत नव्हती.

…………………………………………………..

It may be recalled that the Land in the villages of Vave, Valvali, Andoshi, Malyan, Kune, Usar, Khanav was taken as a reserve for the second phase of the MIDC project. Due to this zoning,  farmers could not do anything in their fields. Also, the could not take any loans on their land or sell it during any emergency. land could not be borrowed or sold for your needs.

..
शासनाने आता एप्रिल 2022 मध्ये अधिसचूना काढून सात गावांतील शेकडो भूखंडांचा औद्योगिक आणि वनीकरण क्षेत्रातून शेती विभागात समावेश केला आहे. The government has now removed the notification in April 2022 and included hundreds of plots in seven villages from the industrial and forestry sector to the agriculture department.
औद्योगिक वा वनीकरण क्षेत्रातून शेती विभागात समावेश करण्यात आलेले सात गावांतील भूखंडांच्या विवरणानुसर  कुणे येथील सर्वाधिक २०६, वळवलीचे १५२ , मल्याणचे १४५ , वावे येथील ५६, उसरचा १५ , आंदोशी ११ , खानाव १  अशा एकूण 586 भूखंडांचा समावेश आहे . यातील उसर येथे महामुंबई क्षेत्रातील सर्वात मोठा गॅस प्लँट असून याच परिसरात रायगड जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज येऊ घातले आहे. According to the details of plots in seven villages included in the agriculture or forestry sector, the highest number of plots is 206 in Kune, 152 in Valvali, 145 in Malyan, 56 in Vave, 15 in Usar, 11 in Andoshi and 1 in Khanav. Among these, Usar is the largest gas plant in the Mumbai area and a medical college in Raigad district is planned to come in this area.
या परिसराला हा परिसर औद्योगिक क्षेत्रातून वगळून तो शेती विभागात समाविष्ट करावा, अशी येथील शेतक-यांची मागणी होती. अखेर सप्टेंबर २०२० मध्ये त्यासाठी नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवून त्यावर दोन वर्षांपूर्वी सुनावणी घेण्यात आली होती . त्यानुसार ता फेरबदल करून आता दोन वर्षांनी का होईना , या परिसराचा शेती विभागात समाविष्ट करण्यास नगररचना विभागाने नुकतीच मान्यता देऊन तसे आदेश काढले आहेत.
– जी . के . थोटे , प्रभारी , सहायक नगररचनाकार
The farmers demanded that the area should be excluded from the industrial area and included in the agriculture department. Finally, in September 2020, objections and suggestions were sought from the citizens and a hearing was held on it two years ago. Accordingly, the town planning department has recently given approval and orders to include this area in the agriculture department after two years.
- G. K. Thote, in-charge, assistant town planner

E-library